उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट आए शुभ दीपावली!

दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत

तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी, कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी, रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी, चला साजरी करूया दिवाळी आली रे आली… शुभ दीपावली

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी, तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी, बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या. शुभ दिपावली.

त्या लोकांनाही हॅपी दिवाळी, जे वर्षभर माझ्यावर जळतात.

मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या या पावन निमित्ताने आणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल…हॅपी दिवाळी.

दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई

या दिवाळीला तुमच्या शेजाऱ्यांची झोप उडवत राहा हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!